
चित्रा कापसे
तिरोडा,दि.०७ःपंचायत समिती तिरोडाच्या सभागृहात आज तहसीलदार नारायण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व BDO संघमित्रा कोल्हे यांच्या उपस्थितीत आपले सरकार सेवा केंद्र (महा-ई सेवा केंद्र), ग्रामपंचायत संगणक परिचालक व आधार ऑपरेटर तसेच सेतू चालक VLE यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या सभेला नायब तहसीलदार सकुंडवार,महा आय टी जिल्हा प्रकल्प प्रमुख राकेश हिवरे,अभियंता विशाल बागडदे प्रामुख्याने उपस्थित होते.सभेत आपले सरकार सेवा केंद्र मार्फत देत असलेल्या विविध सेवा व सुविधा संदर्भात मार्गदर्शन व उद्भवत असलेल्या तांत्रिक अळचणीवर मार्गदर्शन देण्यात आले. त्याचबरोबर सेवा कार्यक्षमतेत वाढ, नागरिकांना जलद सेवा, नागरिकांचे समाधान, आधार प्रोर्ट्ल बाबद चर्चा करण्यात आली. तसेच नविन सेवा अंमलबजावणी, सेवेत पारदर्शिकता जवाबदारीची जाणीव करून देण्यात आली.प्रस्तावना तालुका VLE संघटनेचे अध्यक्ष टोलीराम नेरकर यांनीं केली. सभेला ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष कमलेश अनवादे व कार्यकारणी संगणक परिचालक, VLE संघटनेचे सचिव तारेंद्र गेडाम, प्रकाश पटले, वैशाली तिडके, हितेश कोहळे, ज्योत्स्ना बोरकर, मनोहर पारधी,आशिष उके, हितेश पटले, उपासे, योगेश्वरी पटले, मनोजकुमार हरिणखेडे, महेंद्र सोनवाने, मंदा राऊत, रीना राऊत, उमेश मेश्राम तसेच VLE, संगणक परिचालक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार महा आय टी तालुका व्यवस्थपक निखिल निकोसे यांनी केले.





