38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ प्रगती सहकारी पतसंस्था तिरोडाकडून आमदार रहांगडाले,डॉ.जायस्वाल यांचा सत्कार

प्रगती सहकारी पतसंस्था तिरोडाकडून आमदार रहांगडाले,डॉ.जायस्वाल यांचा सत्कार

0
97

blank

तिरोडा-स्थानिक प्रगती सहकारी पतसंस्था मर्यादित तिरोडा व तिरोडा तालुका कर्मचारी पतसंस्था तिरोडाच्या वतीने वार्षिक आमसभेचे औचित्य साधून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व डॉ.अविनाश जयस्वाल यांचा गो. डि. सेंट्रल को-ऑ बॅंक गोदियाचे संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच संस्थेचे उपाध्यक्ष दिपक पटले सलग चौथ्यांदा सेवा सहकारी संस्था नवेगावचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांच्या सुद्धा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेला उत्कृष्ट सहकार्य करणारे सभासद डॉ. प्रकाश चौधरी, सौ ज्योती मोरेश्वर पटले ,उत्कृष्ट अभिकर्ता म्हणून मुन्नीलाल चौधरी, मीनाताई दीपक पटले यांना स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे तिरोडा तालुका कर्मचारी पतसंस्थेतून सेवानिवृत्त झालेले सभासद सी बी अंबुले उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जी एफ अंबुले केंद्रप्रमुख, डी एम पटले सहायक शिक्षक, डी एल गजभिये उच्च श्रेणी मुख्याध्यापक, बी जे पटले मुख्याध्यापक व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सभासद सौ प्रतिभा नारायण हटवार ,संस्थेच्या सर्व अभिकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष के एस रहांगडाले, जि. प. सदस्या सौ माधुरीताई रहांगडाले,उपाध्यक्ष श्री दीपक पटले संचालक सर्वस्वी एम जी बिसेन,नारायण हटवार, केशव अंबुले, गुलाब पटले, मनोहर नंदनवार, डॉ.राजेंद्र पटले, गंगासागर रहांगडाले, मायाताई रंगारी, तिरोडा तालुका कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश पटले, सचिव राजू गुण्णेवार,कोषाध्यक्ष नीलू ताई लारोकर , संचालक राजूभाऊ चामट ,जे टी बोपचे, डी डी रिनायत ,आर पी भगत, वीरू चव्हाण, संजय रहांगडाले, दीनदयाल पटले, शीलाताई पारधी ,डी एल गजभिये ,सभासद व कर्मचारी उपस्थित होते.संचालन उपाध्यक्ष राजेश पटले यांनी तर आभार प्रदर्शन प्रगती पतसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक पटले यांनी केले.

blank