
वन्यजीव छायाचित्र व ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन
अर्जुनी मोरगाव,दि.०८ः वन्य जीव सप्ताह 2025 च्या अंतर्गत भारतभर वन्यजीव जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय , अर्जुनी मोरगाव येथील प्राचार्य डॉ . ईश्वर मोहुर्ले यांच्या मार्गदर्शना अंतर्गत ग्रंथालय विभाग, मराठी विभाग, भौतिकशास्त्र विभाग आणि आय क्यू ए सी यांच्या वतीने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 ला ग्रंथालयातील वाचन कक्ष भागात वन्यजीवांवर आधारित ग्रंथ प्रदर्शनी व छायाचित्रांच्या प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. एम. राठोड यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आय क्यू ए सी समन्वयक डॉ. के. जे. सीबी, मराठी विभाग प्रमुख डॉ शरद मेश्राम, ग्रंथपाल प्रा अजय राऊत , वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एल. एन. बोरकर, प्रा. ठवरे, प्रा. मोहन धुराटकर, डॉ नितीन विलायकर, डॉ यात्रिक भगत, डॉ कल्पना सांगोळे ,कविता वासनिक,अरुण मुंडले, सुधाकर नागपुरे, डॉ शरद देशमुख, डॉ अमोल श्यामकुवर, प्रा शेखर राखडे, श्री मंगेश शहारे, प्रा. कैलाश लोखंडे इत्यादी उपस्थित होते.
वन्य प्राण्यांवरील छायाचित्रपदर्शनी मागील प्रमुख उद्देश्य विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील विविध पक्ष्यांची व प्राण्यांची ओळख होणे आहे. पक्षी व इतर वन्यजीवांशी संबंधित 75 पुस्तके या निमित्ताने प्रदर्शनीत ठेवण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने या पुस्तकांचे व छायाचित्रांचे निरीक्षण केले. प्रदर्शनीला महाविद्यालयातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भेट दिली तसेच 64 विद्यार्थ्यांनी भेट देऊन वन्यजीव ग्रंथ प्रदर्शनी व वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनीचा लाभ घेतला.
पक्षीमित्र डॉ शरद मेश्राम आणि प्रा. अजय राऊत यांनी काढलेल्या छायाचित्रांचा संग्रह या निमित्ताने प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना बघावयास मिळाला. या वन्यजीव पुस्तकांमध्ये प्रामुख्याने डॉ सलीम अली यांचे चरित्र, बर्डस ऑफ इंडिया, सखा नागझिरा, गोंदिया जिल्ह्यातील पक्षीवैभव, साप, वटवाघुळ, पक्ष्यांचे स्थलांतर, पाखरमाया, भारतीय पक्षी, सरपटणारे प्राणी, जंगलाची दुनिया, छंद पक्षी निरीक्षणाचा, वन्यजीव संवर्धन, कीटकांची नवलाई, अद्भुत पक्षीविश्व, ओळख पक्षी शास्त्राची, बर्डर्स हँडबुक, बर्ड्स ऑफ इंडियन सब कॉन्टिनेन्ट, सारसाची सुरस कहानी, गोंदिया पर्यटन, अमेझिंग एनिमल्स, इत्यादी पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच चमचा पक्षी, शिक्रा, माळ टिटवी, पाचू होला, वेडा राघू, तांबट, सामान्य धीवर, नकेर, सामान्य बाज, लाल मनोली, करड्या डोक्याची मैना, मोठी लाल सरी, अडई, छोटा अर्ली, प्राच्य अर्ली, कलहंस, तलवार बदक, उघड चोच करकोचा, काळ्या मानेचा करकोचा, चष्मेवाला, कमळ पक्षी इत्यादी पक्ष्यांचे छायाचित्र या प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आले होते. प्रदर्शनाच्या आयोजनात भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ डी. एल. चौधरी आणि डॉ शरद मेश्राम यांनी ग्रंथपाल प्रा अजय राऊत यांना मोलाचे सहकार्य केले.




