23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ Vedio…जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात पट्टेदार वाघाची दर्शन

Vedio…जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात पट्टेदार वाघाची दर्शन

0
427

गोंदिया,दि.१२ :.येथील फुलचूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पतंगा चौक परिसरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागच्या परिसरात पट्टेदावर वाघ दिसल्याची घटना १२ आँक्टोंबरच्या रात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नागझिरा अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाची रेस्क्यू टीम घटनास्थळीत दाखल झाली व पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्या वाघाला रेस्क्यू करीत पकडण्यात आले.या वाघाला नागपूर येथील गोरेवाड़ा  प्राणी संग्रहालयामध्ये पाठविण्यात आल्याची माहिती आहे.पट्टेदार वाघ आल्याची माहिती पसरताच नागरिकांनी रात्रीला पतंगा मैदान चौकात गर्दी केली होती.जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागच्या भागात असलेल्या कनक बार परिसरातून हा पट्टेदार वाघ रस्ता ओलांडत पांगोली नदी किनारी असलेल्या राईसमिलकडे पळाल्यानंतर वन्यजिव विभागाच्या रेस्कुटिमने शिताफीने पकडले.

blank