32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांचा भाजपला रामराम,शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांचा भाजपला रामराम,शिवसेनेत प्रवेश

0
390

blank

भंडारा,दि.१९ः स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे पडधम वाजू लागताच सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु करीत ज्या पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळेल त्या पक्षात प्रवेश घेण्याचा सपाटा सुरु केला आहे.त्यातच नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार व्ही.यु.डायगव्हाने यांच्या सुपुत्री विद्यमान भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ कल्याणी राजेश भुरे यांनी शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृवावर विश्वास ठेऊन आज शिवसेनेत प्रवेश केला.सौ.कल्याणी भुरे यांनी काही वर्षापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपच्या एका आमदाराच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता.आता त्या आमदारांवरील त्यांचा विश्वास उडाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.सोबतच भिलेवाड येथील उपसरपंच लोकेश बांते,सोनु बांते,राकेश बांते ,भंडारा येथील माजी नगर परिषद उपाध्यक्ष कविताताई जुगलकिशोर भोंगडे व जुगलकिशोर भोंगडे व गोल्डी लांजेवर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

blank