27.3 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ महासम्राट बळीराजा रथयात्रेचे गोंंदिया जिल्ह्यात उत्साहात स्वागत

महासम्राट बळीराजा रथयात्रेचे गोंंदिया जिल्ह्यात उत्साहात स्वागत

0
45

गोंदिया,दि.१९ः- सिंधु संस्कृतीचा महानायक, महासम्राट बळीराजा यांच्या नावाने भारतभर विविध राज्यांमध्ये विविध प्रकारे सन उत्सव साजरे करतात. महाराष्ट्र मध्ये दिवाळीला बलिप्रतिपदा दिवस आहे. तो दिवस बळीराजाच्या नावाने सामूहिक रित्या साजरा करून श्रद्धा, संस्कृती, सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडावे या उद्देशाने दिनांक 18 आँक्टोंबरपासून निघालेली महासम्राट बळीराजा रथयात्रा आज रविवारला(दि.१९) गोंदियात पोचली,या यात्रेचे उत्साहात स्वागत फुलचूर नाका ,जयस्तंभ चौक व अवंती चौकात करण्यात आले.पाच जिल्ह्यातुन (नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर) भ्रमण करीत शनिवार(दि.१८) गोंंदिया जिल्हयात दाखल झाली.आज सकाळी नवेगावबांध येथून निघालेली ही यात्रा कोकणा,खरबी,कोहमारा,सडक अर्जुनी,डव्वा,मुंडीपार गोरेगाव,गोंदिया येथे पोचली. या यात्रेचे गोंदियाच्या फुलचूर नाका येथे ओबीसी अधिकार मंच,ओबीसी संघर्ष समिती,ओबीसी बहुजन सकल समाजाच्यावतीने यात्रेचे प्रमुख डाॅ.अभिविलास नखाते, रोशन उरकुडे,बंशीधर शहारे, स्वागत करण्यात आले.जयस्तंभ चौक,अवंती चौकात समाजप्रबोधनपर सादरीकरण रथयात्रेच्या आयोजकांनी केले.यावेळी प्रा.डी.एस.मेश्राम,खेमेंद्र कटरे,अमर वराडे,कैलास भेलावे,राजकुमार रामटेके,सविताताई बेदरकर,प्रेम साठवणे,शिशिर कटरे,संजीव रहांगडाले,राजकुमार पटले,जिवनलाल शरणागत,महेंद्र सोनवणे,यशोदा सोनवणे,धनेंंद्र भुरले,देवचंद खोब्रागडे,आर.टी.घरडे,व्यकंटेश चनाप,रविंद्र बडगे,मिलिंद टेंंभुर्णीकर,प्रफुल डोंंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.blank

blank