25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Featured News आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लेकरांसाठी ‘दिवाळी उत्सव

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लेकरांसाठी ‘दिवाळी उत्सव

0
93

सविता बेदरकर यांचा पुढाकार : एक दिवा मानवतेचा’ उपक्रम

गोंदिया : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि गोडधोड करण्याचा सण ! परंतु समाजाच्या एका कोपऱ्यात असेही अनेक जीव आहेत ज्यांच्याकडे ना कुटुंबाची साथ, ना सणाची उब. अनाथ, दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी डॉ. सविता बेदरकर यांनी ‘एक दिवा मनावतेचा’ या भावस्पर्शी उपक्रमातून खऱ्या अर्थाने माणुसकीचा प्रकाश पेटविला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बेदरकर यांच्या सिव्हिल लाईन गोंदिया येथील निवासस्थानी दिवाळी मिलन समारोह १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला समाजातील विविध क्षेत्रातील शिक्षक, अधिकारी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संकलित झालेल्या निधीतून अनाथ, दिव्यांग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना नवीन कपडे, मिठाई, गोडधोड, पॉकेटमनी आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक दानशूर व्यक्ती स्वतःहून सहभागी झाले. वर्षभर अनाथ मुलांना अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य पुरवणाऱ्या सविता बेदरकर दिवाळीच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची जबाबदारीही मनापासून पार पाडतात.blank
यासाठी आ. विनोद अग्रवाल व सविता अग्रवाल, सुनील केलनका, कमल हटवार, डॉ. रवी धकाते, कमलेश नशीने, सुरेखा ठकरेले, छैलबिहारी अग्रवाल, दिव्या भगत, सावन बहेकार, रत्नसेन डहाट, भरत फेंडर, तिलक लारोकर, सुनीता भेलावे, नाननबाई बिसेन, विजय नागपुरे, विजय बहेकार, सुनील तरोणे, संदीप जैन, देवयानी लोखंडे, डॉ. सचिन केलनका, महेंद्र व यशोधरा सोनवाने, सेवानिवृत्त गशिअ कुसुम पुसाम, डॉ. कापगते मॅडम, कापगते, से.नि. प्रा. अनिल मेश्राम सर, अहमद मनीयार, मधुसूदन तरोणे, सी.ए. निखाडे, भगवान नंदागवळी, प्राची व प्रमोद गुडदे, मंजू शिवणकर, मनोज राहंगडाले, वर्षा भांडारकर, आशा नागपुरे, शिक्षक सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, रेणू डोंगरे, डॉ. सुजाता ताराम डॉ. पाचे, डॉ. महेंद्र गजभिये, वंदना लांजेवार उपस्थित होते.

blank