24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home गुन्हेवार्ता कोचेवाहीत थोरल्या भावाने केले धाकट्या भावालाच ठार

कोचेवाहीत थोरल्या भावाने केले धाकट्या भावालाच ठार

0
200

गोंदिया : धाकट्या भावाकडून दररोज होत असलेल्या अपमानाला कंटाळून थोरल्याने चाकूने वार करून धाकट्याला ठार केले. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कोचेवाही येथे राम मंदीर समोर शुक्रवारी (दि.२४) मद्यरात्री १:३० वाजता दरम्यान ही घटना घडली. टिकेंद्रसिंह महेंद्रसिंह बघेले (२२, रा. कोचेवाही) असे मृताचे नाव आहे.
टिकेंद्रसिंह व आरोपी ओमप्रकाश महेंद्र बघेले (२४, रा. कोचेवाही) यांचे घरगुती कारणांतून दररोज भांडण होत होते. तसेच चौकात टिकेंद्रसिंह अपमानास्पद बोलत असल्याचा राग ओमप्रकाशच्या मनात होता.
टिकेंद्र हा शुक्रवारी सायंकाळी ४ वाजतापासूनच मंडईत कार्यक्रम बघण्याकरिता गेला होता. मंडईचे कार्यक्रम बघून सायंकाळी ७ वाजता घरी परत आला होता. तेव्हा त्याच्या आईने जेवण करण्यास म्हटले असता नंतर जेवण करील असे म्हणत टिकेंद्र पुन्हा मंडईत गेला होता. मध्यरात्री १:३० वाजता दरम्यान ओमप्रकाशने संधी साधून आपल्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी चाकूने वार करून त्याला ठार केले. रागातून ठार केल्याची कबुली आरोपी ओमप्रकाशने पोलिसांना दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजुरकर, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, शरद सैदाने, हवालदार भुवनलाल देशमुख, विठ्ठलप्रसाद ठाकरे, सुजित हलमारे, तुलसीदास लुटे, रियाज शेख, प्रकाश गायधने, दीक्षित दमाहे, राकेश इंदुरकर, हसंराज भांडारकर, दुर्गेश पाटील, चालक शिपाई राम खंडारे यांनी केली आहे

blank