देवरी,दि.२६ः देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत विविध ठिकाणी शनिवारच्या (दि.२५)रात्री १०-१२ वाजेच्या दरम्यान ८-१० घर व दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना आज (दि.२६)रविवारला उघडकीस आली आहे.यामध्ये एका पोलीस कर्मचार्याचाही घराचा समावेश असल्याचे वृत्त आहे.देवरीतील प्रतिष्ठित व्यापारी व नेते छोटेलाल बिसेन यांच्या कार्यालयातील लॅपटाप व काही रोख नगदसह सीसीटीव्ही कॅमेराचा सेटअप सुध्दा चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.प्रभाग क्रमांक -2 येथे दोन ठिकाणी घरफोड़ी झाली असून लाखो रुपयांचा ऐवज तसेच रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड़कीस आली.
शहरातील प्रभाग क्रं.२ मध्ये असलेल्या सम्राट बारच्या मागे भाड्याने राहत असलेले बांन्ते व राठोड यांच्या घरातील दाराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेशकरीत कपाटात ठेवलेले 2 तोळे वजनाचे 180000 हजार किमतीची सोने मंगळशुत्र, चांदीच्या तोरड्या आणि भांडी 30 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष 10 हजार रुपयांचा मुद्देमाल यांच्या घरुन चोरुन नेला आहे.सोबतच सी.के. बिसेन,एड.गंगभोईर यांच्यासह अन्य सहा ते सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत माल लंपास केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.





