32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ प्रेस क्लब गोंदियाच्यावतीने नवनिर्वाचित पालकमंत्री नाईक यांचे स्वागत

प्रेस क्लब गोंदियाच्यावतीने नवनिर्वाचित पालकमंत्री नाईक यांचे स्वागत

0
47

blank

गोंदिया,दि.२७-राज्याचे बांधकाम,आदिवासी व स्वयरोजगार विभागाचे राज्यमंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री इंद्रनिल नाईक हे आज(दि.२७)गोंदिया जिल्हा भेटीवर आले असता त्यांचे जिल्हा नियोजन कार्यालयात प्रेस क्लब गोंदियाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच जिल्ह्यातील विविध विषयावर संंक्षिप्तमध्ये चर्चा करण्यात आली.पालकमंत्री नाईक यांनी पत्रकारांच्या सुचना एैकत येत्या काही दिवसात सर्व पत्रकारांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.पालकमंत्री नाईक यांचे स्वागत प्रसंगी जिल्हाधिकारी प्रजित नायर,पोलीस अधिक्षक गोरख भामरे,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरगानांथम,निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे,आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद,जिल्हा माहिती अधिकारी अंजु काबंळे निमसरकर आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रेस क्लबचे पदाधिकारी हिदायत शेख,सावन डोये,संतोष शर्मा,खेमेंद्र कटरे, प्रमोद नागनाथे, मुनेश्वर कुकडे, देवेंद्र रहांगडाले, भरत घासले,शाहिद पठाण,राकेश रामटेके,दुर्गेश येल्ले आदी पत्रकार उपस्थित होते.

blank