24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ रोहयोची कामे बंद; ग्रामपंचायतींचे मस्टर लॉक

रोहयोची कामे बंद; ग्रामपंचायतींचे मस्टर लॉक

0
125

माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांचा आरोप

सडक अर्जुनी, ता. 27 : राज्यात राबविण्यात येणारी रोजगार हमी योजना कालांतराने डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारने स्वीकारून देश पातळीवर सुरू केली. मागेल त्याला काम असे, या योजनेच स्वरूप आहे. पण आताच्या सरकारने या योजनेत अनेक बदल केले असुन त्याचा फटका आता शेतकरी शेतमजूर यांना बसत आहे. सध्या तरी ही योजना गोंदिया जिल्ह्यात फक्त घरकुल आणि झाडे लावण्याच्या कामांपुरतीच राहिलेली आहे. ग्रामपंचायतींचे मस्टर लॉक केल्याचा आरोप माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.
सडक आर्जुनी तालुक्यात ६३ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायतीत या योजनेची मोठ्या प्रमाणावर कामे झालीत. पण, सरकारकडून कुशल कामांची देयके मागील चार वर्षापासून न मिळाल्याने बहुतेक कामे अपूर्ण दिसतात. २० कामे एखाद्या ग्रामपंचायतमध्ये अपूर्ण दिसत असली, तर त्या पंचायतीचे मस्टर आपोआप लॉक होते. या तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे मस्टर लॉक असल्याने घरकुल व झाडे लागवड या दोन कामांशिवाय मस्टर निघतच नाही. या योजनेत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक कामे करण्याची नियोजन आहे. त्यात गुरांचे
गोठे, शेतात सिंचन विहीर, कुकुट पालन केंद्र, गोटफार्म असे अनेक कामे करता येतात. अनेक ग्रामपंचायतीत वैयक्तिक लाभाचे असंख्य कामे प्रशासकीय मान्यता होवून पडुन आहेत. विहिरी, गोठे असे अनेक कामे आहेत. पण, ग्रामपंचायतीचे मस्टर लॉक असल्याने कामेच करता येत नाही व लाभार्थी वंचित राहत आहेत. कारण पूर्वीच्या कामांचे देयके शासनाने न दिल्याने काम अपूर्ण दिसत आहेत. त्यामुळे मस्टर लॉक झाले आहेत. घरकुलांचे बाबतीत तेच आहे. नवीन घरकुल सर्वेक्षण झाले, पण अजून मंजुरी नाही. त्यामुळे जुनीच काही कामे सुरू आहेत. जुन्या सर्वच म्हणजे रमाई, शबरी, मोदी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या सर्व योजना शासनाने बंद केल्या आहेत. नवीन सर्वेक्षण झालेली यादी अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे यांचे मस्टर काढण्याचा प्रश्नच नाही. पावसाळा संपल्याने झाडे लावण्याचा कार्यक्रमसुद्धा बंद आहे. त्यामुळे रोजगार हमीची कामे सध्या बंद अवस्थेत आहेत. ना वैयक्तिक लाभाच्या योजना, ना सार्वजनिक हिताच्या योजना, ना घरकुल, ना झाडे लावणे अशी अवस्था या सरकारने रोजगार हमी योजनेची केली, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.

blank