26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला कर्जमाफी करुन देईल– आमदार बकाने

संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला कर्जमाफी करुन देईल– आमदार बकाने

0
110

 वर्धा-माजीमंत्री बच्चु यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला शेतकरी, शेतमजूर आणि विरोधी पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी वर्धा जिल्ह्यातुन गेलेल्या आंदोलनाला खुप मोठा प्रतिसाद मिळाला. सत्ताधारी पक्षातील भाजप आमदार (BJP MLA) सुद्धा सहभागी झाले. त्यांनी थेट माझा बच्चुभाऊंच्या आंदोलनाला पाठींबा असल्याचे आंदोलनात उपस्थित राहुन जाहीर केले.

प्रसार माध्यमावर त्यांनी व्यक्त केलेल्या जाहीर पाठिंब्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. यामुळे पक्षांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. यातील काही ग्रामीण भागातील कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यायला तयार आहे. भाजप हा शिस्तीतला पक्ष असल्याने पक्षाच्या आदेशाशिवाय कोणताही कार्यकर्ता पुढे येऊन अशा प्रकारचे वक्तव्य करीत नाही. आता तर थेट त्यांच्याच लोकप्रतिनिधीने असे वक्तव्य करून पक्षाची कोंडी झाल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यात व विदर्भातून एकही भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी व नेता आंदोलनात सहभागी झालेला नसून वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव येथील आमदार राजेश बकाने यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनात उपस्थित राहून प्रत्यक्ष पाठिंबा दिला.

याबाबत आमदार बकाने यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी नागपूर वरून वर्धेला येत असताना आंदोलनाला भेट दिली. शेतकऱ्यांचे आंदोलन असल्यामुळे बच्चू कडूंना भेटलो. त्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली. हे आंदोलन बच्चू कडू यांचेच नाही तर शेतकऱ्यांचे आहे. कर्जमाफी ही रास्त मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आंदोलन स्थळावरूनच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जाहीरनाम्यानुसार निश्चितच भारतीय जनता पक्ष आश्वासनाची पूर्तता करून महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला कर्जमाफी करुन देईल असा विश्वास आमदार बकाने यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला व्यक्त केला.