गोरेगाव : जिल्ह्यात गेले तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच मावा तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे अनेक भागांमध्ये धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पन्नाची
अपेक्षा असतानाच अवकाळी पावसाने निराशा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांनी सोमवारी (दि.२७) प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. डॉ. भगत यांनी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाकडे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी यावेळी धान पिकावर झालेल्या मावा तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबाबत आपली व्यथा व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे जमिनीवर पडले असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धान पिकांचे नुकसान बांधावर जाऊन जि.प.सभापती डॉ.भगत यांनी केली पाहणी
अवकाळी पावसामुळे तसेच मावा तुरतुडा या कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेत जिल्हा परिषद गोंदिया येथील अर्थ व बांधकाम समितीचे सभापती डॉ. लक्ष्मणजी भगत यांनी जिल्हा प्रशासनाला नुकसान भरपाईसंदर्भात निवेदन दिले.हे निवेदन जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी गोंदिया, जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार गोरेगाव तसेच तालुका कृषी अधिकारी गोरेगाव यांना सादर करण्यात आले.डॉ. भगत यांनी यावेळी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि मावा तुरतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.





