गोंदिया : कुठलाही राजकीय पक्ष हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या बळावरच मोठा होत असतो. कार्यकर्ते हीच पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात मला काम करण्याची संधी मिळाली असून, ते मी माझे भाग्य समजतो. आगामी काळात नगरपरिषद निवडणूक होणार आहे. विविध विकासकामांची व प्रश्नांचा ऊहापोह केला जाईल. हे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी बुथ कमिट्यांवर भर द्यावा तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ते सोमवारी (दि.२७) प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह संवाद साधला. याप्रसंगी माजी आ. राजेंद्र जैन, आ. राजकुमार बडोले, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, नरेश माहेश्वरी, केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर, माधुरी नासरे, सुरेश हर्षे, किशोर तरोने, बाळकृष्ण पटले, नानू मुदलीयार, हुकूमचंद अग्रवाल, अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, गणेश बरडे, मनोहर वालदे, अशोक सहारे, योगेंद्र भगत, बाळा हलमारे, अविनाश जायस्वाल, जगदीश बावनथडे, किरण पारधी, टी.एम. पटले, राजकुमार जैन, रतिराम राणे, अजय गौर, हेमंत लिल्हारे, मदन चिखलोंढे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा सत्कार करण्यात आला. माजी आ. राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया जिल्ह्यात आपल्या पक्षाचा प्रभाव कसा वाढेल यासाठी आपण प्रयत्न केले तर निश्चितच याचा लाभ येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला





