26.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहिमेत गोंदियाची राज्यात आघाडी

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहिमेत गोंदियाची राज्यात आघाडी

0
173
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 31;

गोंदिया,दि.31 -प्रधानमंत्री यांच्या महत्वकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत भारत देश हा क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत मोहीम (PMTBMBA).अंतर्गत गोंदिया जिल्ह्याने २०२४-२५ या वर्षात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर २०२५-२६ या वर्षातही जिल्ह्याने केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या १०बिंदुवर काम करण्यास सुरवात केली असून यावर्षी सुध्दा राज्यात अव्वल स्थान टिकवून ठेवण्याकरीता जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामाला लागल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अभिजित गोल्हार यांनी दिली.डाॅ.गोल्हार यांनी प्रेस क्लबच्यावतीने आयोजित प्रसारमाध्यमांशी सवांद कार्यक्रमात बोलतांना सांगितले की,आधीच्या तुलनेत आमच्याकडे आता तपासणी प्रयोगशाळा व निक्षय मित्रांचा मिळत असलेला उत्कृष्ठ सहभागामुळेच जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर नावलौकीकास येऊ लागले आहे.
क्षयरोग म्हटले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु योग्य औषधोपचार, समतोल आहार घेतल्यास या रोगावर सहज मात करता येते. क्षयरोगाने बाधित रुग्ण दगावू नये म्हणून शासनातर्फे जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्यांपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.जिल्ह्यात २१ प्रयोगशाळेतून तपासणी केली जात असून डिसेबंर २०२५ अखेर पर्यंत ४९ हजार ५४७ तपासणीचे लक्ष्यांक देण्यात आले होते,जे  सप्टेंबर २०२५ पर्यंत पुर्ण करीत ६७ हजार ८१९ तपासण्या पुर्ण करण्यात आलेल्या आहेत.त्याचप्रमाणे १०० दिवस कार्यक्रमांतर्गत ३२० रुग्ण शोधण्याचे उदिष्ठ देण्यात आले असताना ७२० नवीन रुग्णांचा शोध घेण्यात आले.त्याचप्रमाणे यावर्षी २२५० नवीन रुग्ण शोधण्याचे उदिष्ठापैकी १९२८ रुग्णांचा शोध आरोग्य सेवेतील अधिकारी,कर्मचारी व निक्षय मित्रांच्या मदतीने घेण्यात आल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.गोल्हार यांनी सांगितले.गेल्या काही वर्षाच्या तुलनेत तपासणी चाचणीचे प्रमाण प्राथमिक आरोग्य केंंद्रात ३ टक्क्यांनी तर ग्रामीण रुग्णालयात ५ टक्यांनी वाढल्याचे सांगितले.blank
गोंदिया जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. यात राष्ट्रीयक्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, एनजीओ, खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाèयांसह क्षेत्रीय कर्मचारी, आशा वर्कर यांच्या माध्यमातून क्षयरोग आजाराबद्दल जनजागृती व सर्वेक्षण करण्यात येते.क्षयरोगाची खात्री झाल्यावर रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यात येतात.रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार नियमित सहा महिने औषधोपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णतः बरा होतो.जर या रोगाची काळजी घेतली नाही आणि योग्य औषधोपचार केला नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यताही असते.धूम्रपान, मद्यपान,तंबाखू आदी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे.तसेच रुग्णाला भुख कमी लागणे,शरीराला कमजोरी येणे हे लक्षण येताच वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे.
जिल्ह्यात हिवतापावरही अंकुश
हिवताप, मेंदुज्वर,चिकुनगुनिया, हत्तीपाय व डेंग्युची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी नियमित गृहभेटी देत सर्वेक्षण करुन डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने केलेल्या उपाययोजनेमुळे यावर्षी हिवताप रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात ५ लाख १ हजार ८९८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती,ती यावर्षी ७ लाख ६१ हजार ३९३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.या वर्षात १ महिलेचा हिवतापामुळे मृत्यू झाला सून ७७०९ बाहेरगावावरुन आलेल्यापैकी ४६ तर जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या तपासणीत १६ विद्यार्थी पाॅझिटिव्ह आढळले.त्यांच्यावर सलग तीनवेळा उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ.विनोद चव्हाण यांनी यावेळी दिली.
२७ टक्के कर्मचाऱ्यांची  पदे रिक्त
विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य विभागात २७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीपासून ‘गट अ’ ते सर्व श्रेणीचे जिल्हा आरोग्य विभागात ९३८ पदे मंजुर आहेत. त्यापैकी ६३४ पदे भरलेली आहेत. तर २५१ पदे रिक्त आहेत. विशेषतः आरोग्य सेविका, प्रयोग शाळा, आरोग्य सेवक, स्वच्छक या कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक वाणवा आहे. असे असतांनाही गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग राज्यात उत्तम कामगिरीच्या बळावर सरस ठरत आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्यासोबत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद वाघमारे, जिल्हा महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण,डाॅ.निरजंन अग्रवाल,प्रकाश खरात,पियुष श्रीवास्तव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.