देवरी,दि.३१- देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त देवरी येथे पोलिस विभागाच्या वतीने
‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आज शुक्रवारी (दि.३१) करण्यात आले होते.
देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मडामे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद राठोड, ओमप्रकाश गेडाम, महिला पोलिस उपनिरीक्षक गीता मुळे यांचे नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या ‘रन फॉर युनिटी’ या आयोजनामध्ये देवरी पोलिस ठाण्याचे १२ पोलिसअधिकारी, ८७ पोलिस कर्मचारी देवरी वनविभागाचे १६ कर्मचारी आणि १८५ गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपला उत्फुर्त सहभाग नोंदविला.




