32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक केंद्रप्रमुख रविंद्र चेके यांचा  इंग्रजी वाचनाचा अभिनव उपक्रम

केंद्रप्रमुख रविंद्र चेके यांचा  इंग्रजी वाचनाचा अभिनव उपक्रम

0
30

blank

 *इंग्रजी वाचन ‘शिकावे कसे’ या अध्ययन तंत्राचा होणार वापर
खामगावP तालुक्यातील पळशी केंद्राचे केंद्रप्रमुख रविंद्र चेके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण केंद्रातील इंग्रजी वाचनामध्ये मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांचे उच्चार कसे शिकावे याकरीता अतिशय अभिनव व नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना 60 दिवसात आणि दररोज 15 मिनिटे वेळ देऊन इंग्रजी शब्द वाचनाचा अभिनव उपक्रम 60 दिवसासाठी राबविला जाणार असून या जागतिक स्पर्धेत शिकवावे कसे यापेक्षा शिकावे कसे यावर भर देणे फार आवश्यक आहे . जानेवारी ते मार्च या कालावधीत अतिशय नाविन्यपूर्ण  आणि तणावविरहीत पद्धतीने सर्व विद्यार्थी इंग्रजी वाचन शिकतीलच याचा मला विश्वास आहे. असे केंद्रप्रमुख रविंद्र चेके म्हणतात .केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
*अशी होणार उपक्रमाची अंमलबजावणी.* 
दररोज सायंकाळी केंद्राच्या गृपवर 10-15 मिनिटांचा व्हिडिओ पाठवण्यात येईल.शिक्षक तो व्हिडिओ पाहून त्यातील पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना 10-15 मिनिटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.सोमवार ते शनिवार दररोज 10-15 मिनिटे विद्यार्थी इंग्रजी वाचनाच्या अभिनव पद्धतीने इंग्रजी शब्दांचे उच्चार कसे करावे हे शिकतील.
इंग्रजीमध्ये शब्द बदलला की ,a ,e, i,o,u या अक्षरांचे उच्चार बदलतात. जसे की, ‘Fan’ या शब्दात ‘a’ चा उच्चार  ‘ॲ’ होतो. ‘Car’ या शब्दात ‘a’ चा उच्चार ‘आ’ होतो. ‘Call’ या शब्दात ‘a’ चा उच्चार ‘ऑ’ होतो. ‘Cake’ या शब्दात ‘a’ चा उच्चार ‘ए’ असा होतो. सर्वच स्वरांच्या बाबतीत असे घडते.जसे की, ‘O’ चा उच्चार ओ,ऑ . ‘i’ चा उच्चार ‘इ’, ‘आइ’ .’U’ चा उच्चार ‘अ’, ‘यू’ . अशाप्रकारे शब्दातील a,e,i,o,u या अक्षरांचे उच्चार बदलतात आणि विद्यार्थी गोंधळतात ; परंतु यामागील तंत्र शोधून विद्यार्थ्यांना स्वतःच शब्दांचा अचूक उच्चार शिकता यावा या उद्देशाने शिक्षक राजेश कोगदे  यांनी एक उपक्रम तयार केला. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘शिकावे कसे’ हे तंत्र विद्यार्थ्यांना कळेल व विद्यार्थी आत्मविश्वासाने स्वतः इंग्रजी शब्दांचे उच्चार शिकू शकतील हे मात्र विशेष!
 *रविंद्र चेके*  *केंद्रप्रमुख पळशी बु!*

blank