वयाची ७० ते ९५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ सभासदांचा गौरव
तिरोडा-जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना शाखा तिरोडाच्या वतीने २९ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक झरारिया मंगल कार्यालय येथे ‘पेन्शन डे’ आणि ‘वार्षिक अधिवेशन’ अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात वयाची ७०, ७५, ८०, ८५, ९० आणि ९५ वर्षे पूर्ण करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दू. कटरे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार भजनदास वैद्य, नगराध्यक्ष अशोक असाटी आणि नगरसेवक अनिकेत कटरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जेष्ठांचा सन्मान आणि मार्गदर्शन आपले संपूर्ण आयुष्य शासकीय सेवेत व्यतीत केल्यानंतर, सेवानिवृत्तीनंतरही संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची यशस्वीता हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. डी. एस. पटले, उपाध्यक्ष श्री. ता. ब. पटले, सचिव श्री. पी. बी. बिसेन आणि सहसचिव श्री. एल. ए. चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच कार्याध्यक्ष श्री. एच. एच. कटरे , कोषाध्यक्ष श्री. एस. जे. पारधी , श्री. बी. जे. पटले , श्री. ठोंबरे, श्री. सुरसाउत, श्री. हिंगे , श्रीमती सुशीलाबाई आगाशे , श्रीमती मीनाक्षी ठाकरे , श्री. के. एस. मेश्राम आणि श्री. व्ही. जे. अंबुले यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचे सहकार्य केले. या अधिवेशनाला तालुक्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.





