34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ सेवानिवृत्त पोलिसांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सेवानिवृत्त पोलिसांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0
29

blank

चित्रा कापसे
तिरोडा-सेवानिवृत्त पोलीस अधिकारी /अंमलदार असोसिएशन गोंदिया जिल्हा, चे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 30/12/2025 रोजी प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, कारंजा, गोंदिया येथे थाटात पार पडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, प्रमुख पाहुणे डॉ. कुसुमाकार घोरपडे,अधिष्ठ, शासकीय वैधकीय महाविद्यालय, गोंदिया हे होते.यावेळी जेष्ठ नागरिक संघ गोंदियाचे अध्यक्ष नारायण जमाईवार, सचिव दुलीचंद बुद्धे सेवानिवृत्त पोलीस संघटना भंडारा येथील पुंडलिक निखाडे, ओंकार श्रीवास,पोलीस बाईज संघटना चे संतोष पुंडकर, केदार कटारे,अजय पटले, युवराज चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी 70 वर्ष पूर्ण करणारे सेवानिवृत्त सदस्य चंद्रकांत दीक्षित,रूपचंद गायधने, महादेव सपाटे, चित्रसेन पटले,रमेश कोल्हे,भिका ठाकरे, सेवकराम कुंभरे, श्रीराम सिगंणजुडे, यांना स्मुर्ती चिन्ह, पुस्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. मोंटू त्यागी, डॉ.प्राजक्ता येरूमवार,यांनी जेष्ठ नागरिका करिता आरोग्य तपासणी, औषधोपचार, शासनाची विविध योजना संदर्भात, ए एस आय सेंद्रे यांनी सायबर क्राईम , नारायण जमईवार यांनी जेष्ठ नागरिक कार्ड,दुलीचंद बुद्धे यांनी जेष्ठ नागरिका संदर्भात शासनाच्या विविध योजना बद्दल आपापले विचार मांडले. अध्यक्ष योगेश पारधी यांनी सेवानिवृत्त पोलीस बांधवाचे विविध समस्या व मागण्याबाबत आपले विचार मांडले. सेवानिवृत्त पोलीसांच्या सर्व समस्यांच्या निराकरण करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिले.
प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष योगेश पारधी यांनी मांडले. संचालन ब्रिजकिशोर तिवारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश सरोदे, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, गोंदिया,सचिव छोटेलाल मिश्रा, राजू खामले जागेश्वर दुधपचारे, रमेश येडे,रमेश कुंभलकर,गुणीलाल बघेले, गेंदलाल येडे, रमेश कुंभरे यांनी सहकार्य केले.

blank