23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ दरेकसा अंतर्गत हिवताप अति संवेदनशिल गावात जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या भेटी 

दरेकसा अंतर्गत हिवताप अति संवेदनशिल गावात जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या भेटी 

0
56
गोंदिया, दि.22 : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी आज सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत हिवतापाकरीता अति संवेदनशिल असलेले अतिदुर्गम मुरकुटडोह, दंडारी, दलदलकुही, टेकाटोला, नवाटोला व पिपरिया येथे भेटी देवुन कार्यक्षेत्रात किटकजन्य कार्यक्रमाची होत असलेल्या कामाची पाहणी केली.
            प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील हिवताप दुषित रुग्णाची विचारपुस करुन दिल्या जात असलेल्या औषधोपचाराची माहिती जाणुन किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी केली. गावात आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत ताप रुग्ण व कंटेनर शोध मोहिमेची माहिती जाणुन घेतली. गावात प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला.
           किटकजन्य आजाराबाबत सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी यांचेसह आरोग्य संस्थेत चांगली सेवा देत असल्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांचे राबविण्यात येत असलेल्या कार्याचे समाधान व्यक्त करुन दररोज होत असलेल्या कामाचे पर्यवेक्षण चांगल्याप्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. भेटी दरम्यान त्यांचेसोबत डॉ.पारस गिरी, आरोग्य पर्यवेक्षक किशोर भालेराव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ठाकरे उपस्थित होते.
    डॉ.विनोद चव्हाण यांनी भेटी दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र दरेकसा येथील प्रयोगशाळेत किटकजन्य कार्यक्रमाचे आवश्यक रजिष्टर व रेकॉर्डची पडताळणी केली. तसेच आंतररुग्ण वार्ड, औषधीसाठा केंद्र इत्यादीची पाहणी केली. कार्यक्षेत्रातील गावे हे अतिदुर्गम व जंगलव्याप्त असल्याने हिवतापाबाबतची साथ उदभवु नये म्हणुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, कीटकजन्य, जलजन्य आजार तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे, कार्यक्षेत्रातील 100 टक्के अंडवृद्धी शस्त्रक्रीया होण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय येथे भरती करणे, आश्रमशाळा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आर.डी.के. किट द्वारे रक्त तपासणी करणे, स्थलांतरी लोकांची यादी अद्यावत करुन पत्ता सिजन कामावरुन गावी परतलेल्या लोकांचे हिवतापाबाबत तपासणी करणे, आरोग्य संस्थेत हिवताप बाबतचे रक्त नमुने बॅकलॉग ठेवु नये, हिवतापाबाबत गप्पी मासे व लारवा यांचे शाळेत प्रात्यक्षिक जनजागृती कार्यक्रम घेणे इत्यादी विविध बाबी सोबतच लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

blank