29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home राजकीय साकोली नगरपरिषद उपाध्यक्षापदी रोहीणी एच. मुंगूलमारे

साकोली नगरपरिषद उपाध्यक्षापदी रोहीणी एच. मुंगूलमारे

0
63

⭕ स्वीकृत नगरसेवक म्हणून न्यायालयाचे प्रतिष्ठीत ॲड. दिलीप कातोरे व नितीन खेडीकर

साकोली : साकोली सेंदुरवाफा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षापदी आज (१६ जाने.) रोहिणी हेमकृष्ण मुंगुलमारे यांची निवड झाली. रोहिणी मुंगुलमारे यांना एकूण १२ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार इंजि. संदीप बावनकुळे यांना ७ मते मिळाली. तर दोन सदस्य हे तटस्थ राहिले. यात स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रतिष्ठीत ॲड. दिलीप कातोरे तर श्री संत लहरीबाबा मठ देवस्थानचे सचिव नितीन खेडीकर यांची निवड करण्यात आली.

साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद येथे आज शुक्रवारी झालेल्या उपाध्यक्षा आणि स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियांमध्ये उपाध्यक्षा आणि नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेतील सत्ता समीकरणे अधिक स्पष्ट झाली आहेत. उपाध्यक्षापदी सेंदूरवाफा येथील रोहिणी हेमकृष्ण मुंगुलमारे यांचा विजय भाजपच्या वाढत्या संख्येचे आणि संघटनात्मक ताकदीचे प्रतिबिंब म्हणून पाहिला जात आहे. अ‍ॅड. दिलीप कातोरे यांची दुसऱ्यांदा स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर येथील आराध्य दैवत संत श्री लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्टचे सचिव नितीन खेडीकर यांची सुद्धा स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षा देवश्री एम. कापगते यांनी नवनियुक्त नगरपरिषद उपाध्यक्षा रोहीणी एच. मुंगूलमारे, स्वीकृत नगरसेवक ॲड. दिलीप कातोरे व नितीन एम. खेडीकर यांचे दालनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत अभिनंदन केले. यावेळी सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

blank