27.3 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home गुन्हेवार्ता सालेकसा उपकृषी अधिकारी टाकरस पाच हजाराची लाच घेतांना जेरबंद

सालेकसा उपकृषी अधिकारी टाकरस पाच हजाराची लाच घेतांना जेरबंद

0
384

गोंदिया,दि.१६- सालेकसा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील वर्ग ३ उपकृषी अधिकारी रमेश मारोतराव टाकरस(वय 50)आरोपी लोकसेवक यांने आपल्या पदाचा दुरुपयोग करून ५ हजाराची लाच स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.आरोपी लोकसेवकाने तक्रारदारास रोटावेटरचे 40,000/ रुपयांचे अनुदान मंजूर करून काढून दिल्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयाची मागणी केली होती.त्या त्यानुसार तक्रारदारा कडून 5000/ रुपये लाच रक्कम स्विकारतांना आज रंगेहात पकडण्यात आले.कारवाई दरम्यान आरोपीच्या अंगझडतीत 6080/रुपये मिळून आले ते त्यांना वेळीच परत करण्यात आले आहेत.आरोपी यांच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा किमती 5000 रु. चा 1 मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीची घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाने कळविले आहे.

प्रकरण अशा प्रकारे आहे की, तक्रारदार यांच्याकडे 5 एकर शेती असून शेतीचे काम करण्यासाठी त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY वैयक्तिक लाभार्थी योजना 2.0) अंतर्गत शेतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचे रोटावेटरची केंद्र शासनाची योजना असून सदर योजनेअंतर्गत रोटावेटरला शासनाचे 40,000/ रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने व त्यांना रोटावेटरची आवश्यकता असल्याने, त्यांनी दिनांक 17.6 2025 रोजी शिव अग्रो गोंदिया येथून 105000/ रुपये किमतीचा रोटावेटर विकत घेतला. तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथून सदर योजनेचा फॉर्म उपलब्ध करून घेऊन तो भरून, त्यासाठी लागणारे कागदपत्र व रोटावेटर खरेदी केलेले जीएसटी बिल त्यासोबत जोडून त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय साले कसा येथे सहा महिन्यापूर्वी दाखल करण्यासाठी गेले असता, श्री टाकरस उपकृषी अधिकारी यांनी तक्रारदार यांचा फॉर्म दाखल करून घेऊन रोटावेटर चे 40 हजार रुपयाची अनुदान मिळण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदार यांनी माझ्याकडे पैसे नसल्याबाबत सांगितले असता श्री टाकरस यांनी बिल मंजूर झाल्यावर दहा हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणाले. दिनांक 12.12. 2025 रोजी रोटावेटर चे अनुदानाचे 40,000/ रुपये कधी येणार हे विचारण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे तक्रारदार गेले असता श्री टाकरस यांनी रोटावेटर चे 40 हजार रुपये अनुदान आठ दहा दिवसात मिळून जाईल असे सांगून मंजूर झाल्यावर दहा हजार रुपये आणून द्या असे म्हणाले. दिनांक 18.12.25 रोजी रोटावेटर चे 40,000/ रुपयांचे अनुदान तक्रार यांचे बँकेच्या खात्यावर जमा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी श्री टाकरस साहेबांची त्यांचे कार्यालयाबाहेर भेट झाली असता त्यांनी ठरल्याप्रमाणे 10,000/रुपये आणून द्या असे म्हणाले . श्री टाकरस यांनी दिनांक 12.01 .26 रोजी 10,000/ रुपये घेऊन बोलावले असल्याने व तक्रारदार यांना ती लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 12.01.2026 रोजी सापळा अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांना फोन द्वारे कळवले होते.
सदर तक्रारीवरून दिनांक 12. 01.2026 रोजी सापळा अधिकारी यांनी दोन पंचासह सालेकसा येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार घेऊन दिनांक 12.01.2026 व दिनांक 16.01. 26 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, आलोसे यांनी तक्रारदार यांना रोटावेटर चे अनुदान मंजूर करून काढून दिल्याच्या मोबदल्यात 5000/ रुपयाची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार 16.01. 2026 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांची रोटावेटरचे 40,000/ रुपयांचे अनुदान मंजूर करून काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचे कडून 5000/ रुपये लाच रक्कम स्वीकारून गैरफायदा घेतला आहे.पोस्टे. सालेकसा जिल्हा गोंदिया येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरिक्षक उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत,संयुक्त फौजदार चंद्रकांत करपे , पोलीस हवलदार संजय बोहरे, मंगेश कहाळकर, पोलीस नाईक संतोष शेंडे संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, संगीता पटले, रोहिणी डांगे, दीपक बाटबर्वे आदींनी केली.

blank