गोंदिया :एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम शनिवारी (दि.१७) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेविका प्रीती वालदे आणि माजी नगरसेविका मनसरबाई गोंडाने यांच्या हस्ते करण्यात आले.
राहुल प्रमुख पाहुणे म्हणून वालदे, एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक अनिल गोंडाने, प्राचार्या अनुसया लिल्हारे, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. छाया राणा, प्रा.आरती चौधरी, प्रा.प्रीती वैद्य, प्रा.प्रज्ञा गांवडे, प्रा. मनिष चौधरी, प्रा. सौरभ बघेले,प्रा. आकाश श्रोते, राजू रहांगडाले, राजा उंदिरवाडे, मयुरी बघेले, योगेश्वरी ठवरे, रूपाली धमगाये व सर्व विद्यार्थी गण उपस्थित होते. वालदे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून आपला परिसर स्वच्छ करण्याचे कार्य स्वतःपासून सुरू करण्यास सांगितले.
या कार्यक्रमात सोमू जतपेले,
हिमांशू बडोले, स्वयम बांगरे, शुभम गजघाटे, मयूर गणवीर, आदेश चत्रे, गौरव लाळे, सागर साखरे, पूजा राणे, रेखा फुल्हारे, करिना मोहारे, श्वेता उपराडे, निकिता डोंगरवार, मोनाली रहांगडाले, खुशबू मोहारे, करिश्मा मोहारे, भारती दमाहे, भूमिका मच्छीरके आणि करिश्मा नागपुरे या विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.
संचालन प्रा. प्रज्ञा गावंडे यांनी केले. आभार प्रा. रामेश्वरी पटले यांनी मानले.





