26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ नशा व अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा: गृह राज्यमंत्री भोयर यांना निवेदन

नशा व अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा: गृह राज्यमंत्री भोयर यांना निवेदन

0
33

गोरेगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढत असून आजची पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. अशात जिल्ह्यात उपलब्ध होत असलेले ड्रग्स, बनावट दारू व इतर अवैध पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने गृह राज्यमंत्री तसेच जिल्हा संपर्कमंत्री पंकज भोयर यांना निवेदन देऊन केली आहे.
गेल्या काही वाढ काळापासून जिल्ह्यात व्यसनाधीनतेच्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः युवकांमध्ये गांजा, ड्रग्स, कोरेक्ससारखी प्रतिबंधित औषधे मोठ्या प्रमाणावर पोहोचत असून काही भागांमध्ये बनावट दारूचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसोबतच सामाजिक आरोग्यासाठीही गंभीर धोका निर्माण करणारी आहे. अशात जिल्ह्यात तत्काळ विशेष ‘अँटी-ड्रग्स ड्राइव्ह’ राबविण्यात यावे, नशा तस्करी, अवैध दारू निर्मिती व
विक्रीमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्ती व टोळ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि निर्णायक पावले उचलावीत अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे. भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वात निवेदन देताना हर्ष मोदी, पं. स. माजी सभापती मनोज बोपचे, पुष्पराज जनबंधू, विकी बघेले, इंदरजितसिंग भाटिया, संतोष कटरे आदी उपस्थित होते.

blank