25.9 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ पाच लाखाची लाच घेतांना उपविभागीय कृषी अधिकारी जाळ्यात

पाच लाखाची लाच घेतांना उपविभागीय कृषी अधिकारी जाळ्यात

0
31

गोंदिया,दि.26- जिल्ह्यातील  देवरी  उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांना एका एका खाजगी इसमाच्या माध्यमातून पाच लाखाची लाच सिवीकारताना आज सोमवारला चन्द्रंपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई देवरी येथील कुमारसिंग सोमवंशी यांच्या दुकानात केली.एका बियाने विक्री करणार्या कंपनी मालकाकडुन कंपनीविरुध्द कारवाई न करण्यासाठी 6 लाखाची लाच  मागितली होती.तक्रारकर्त्यालालाच द्यायची नसल्याने त्यांने चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारे सापळा रचून आज कुमारसिंग सोमवंशी यांच्यामार्पेत लाच घेतांना रंगेहाथ पकडले.