
अर्जुनी-मोर-दिव्यांग कल्याणकारी संघटना, गोंदिया शाखा अर्जुनी-मोरगाव यांच्या वतीने मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्जुनी-मोर. येथील सभागृहात सुप्रसिद्ध समाजसेवक अमिताभ सांतरा (नागपूर) यांचा ५९ वा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील ११० दिव्यांग बांधवांना साड्या व कंबलांचे वस्त्रदान करण्यात आले. सदर वस्त्रदान मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला गजानन डोंगरवार, अर्चनाताई दुणेदार (समाजसेविका, नागपूर), नागपुरे सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी दिव्यांग कल्याणकारी संघटना व सर्व दिव्यांग बांधवांनी अमिताभ सांतरा यांचे पुष्पहार व फुलांच्या वर्षावात सन्मानपूर्वक स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे ब्याचेस लावून स्वागत करण्यात आले तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेच्या वतीने अमिताभ सांतरा यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना अमिताभ सांतरा म्हणाले.“दिव्यांग बांधव हे समाजाचे ओझे नसून ते समाजाची ताकद आहेत. त्यांना सहानुभूती नव्हे तर संधीची गरज आहे. दिव्यांगांच्या आत्मसन्मानासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. आजचा हा कार्यक्रम माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.”उपस्थित सर्व मान्यवरांनीही दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करत त्यांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रविण शहारे (मोरगाव/अर्जुनी) यांनी केले, तर प्रास्ताविक दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष अशोक रामटेके यांनी केले.कार्यक्रमाचे विशेष नियोजन दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष अशोक रामटेके व दिव्यांग न.प. अध्यक्ष अमित देवानी यांनी केले.दिव्यांग बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत सदर कार्यक्रम अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.





