26.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home Top News सुकमा जिल्ह्यात चकमकीत दोन नक्षलवादी ठार

सुकमा जिल्ह्यात चकमकीत दोन नक्षलवादी ठार

0
32

वृत्तसंस्था

सुकमा – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी विरोधा मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.पोलिस अधिक्षक इंदिरा कल्याण इलेसेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील फुलबाडगी पोलिस ठाण्यांतर्गत नक्षलवादीविरोधी अभियान सुरु असताना झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. जिल्हा राखीव दल (डीआरजी), छत्तीसगड शस्त्रास्त्र दल (सीएएफ) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबविली होती. नक्षलवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला, पण ते जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले.
मृत नक्षलवाद्यांजवळून दोन बंदुका आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सोमवारीही बस्तर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता.