26.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home Top News 4 भारतीय महिलांना समझोता एक्स्प्रेसमध्ये चढण्यापासून रोखले

4 भारतीय महिलांना समझोता एक्स्प्रेसमध्ये चढण्यापासून रोखले

0
23

वृत्तसंस्था

लाहोर, दि.27- पाकिस्तानातील रेल्वे अधिका-यांनी सोमवारी चार भारतीय महिलांना नवी दिल्लीला जाणा-या समझोता एक्स्प्रेसने प्रवास करण्यापासून रोखले.  कागदपत्रांची पुर्तता न केल्याने त्या महिलांना समझोता एक्स्प्रेसमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली नाही असे सांगण्यात येत आहे. महिलांनी वाघा रेल्वे स्थानकावर पाकिस्तानातील रेल्वे अधिका-यांविरोधात निदर्शने केली. अनेकदा आम्ही रेल्वे अधिका-यांना विनवणी केली, आमचे नातेवाईक भारतात आमची वाट पाहत आहेत असं एका महिलेने सांगितले. सोमवार आणि गुरूवारी नवी दिल्ली आणि लाहोरदरम्यान समझोता एक्सप्रेस चालवण्यात येते.  कागदपत्रांची पुर्तता करून त्या महिला गुरूवारी भारतात जाऊ शकतात असे रेल्वेच्या एका अधिका-याने सांगितले.