25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हरपलं; बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हरपलं; बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

0
996
बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज, बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला.या अपघातानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.