तिरोडा : तालुक्यातील सेजगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य सेजगाव येथे ग्राम पंचायतच्या वतीने सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच एसएससी जीडी मध्ये निवड झालेल्या गावातील पाच युवकांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन पटले, पंचायत समिती सदस्या सौ.ज्योतीताई शरणागत, ग्राम पंचायत सरपंच सौ.उषाताई कठाने, ग्रा.वि.अधिकारी अतुल ठाकरे, उपसरपंच टेकचन्द बिसेन, ग्राम पंचायत सदस्य सुरेश पारधी, गौरीशंकर पारधी, तीर्थराज पारधी, सौ.ज्योती भालाधरे, सौ.हंसाबाई बावनकर, सौ.प्रियंका राऊत, सौ.गीता उके, निलेश मालाधरी पोलीस पाटील सेजगाव, के.बी.सोनेवाने, डॉ.किशोर पारधी, डॉ.महेंद्र पारधी, ए.के.कठाने, ज्ञानेश्वर पटले, चंद्रकुमार बिसेन, तंमुस अध्यक्ष श्रीकृष्ण शरणागत, सतीश बिसेन, सौ.वेणुताई पारधी तसेच गावातील सर्व तरुण मंडळी उपस्थित होते.
सेजगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाजार चौक येथे ग्राम पंचायत द्वारा संचालित सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान एसएससी जीडी मध्ये गावातील विश्वजीत श्यामराव बावनकर, हर्षल तिलकचंद पटले, सतीश राजकुमार अंबुले, दिलेश अनिरुद्ध गायधने यांचा ग्राम पंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.





