देवरी, दि.०१:- स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूण्यतिथीचा कार्यक्रम” हुतात्मा दिन “म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षानी प्राचार्य मनोज भुरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून एस. टी. भांडारकर, पी एस खैरे, ए. टी. मते हे होते. यावेळी प्रथमतः माँ शारदा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन व माल्यार्पन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व भाषणातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व या महापुरुषाला अभिवादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी. एच. येटरे , संचालन कु. गायत्री ताराम व कु अवनी ऊईके तसेच आभार प्रदर्शन कु. जास्मिन वैद्य यांनी केले.





