35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ कुणबी समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा

कुणबी समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा

0
41

blank

गोंदियावासीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन
​गोंदिया:येथील न्यू लक्ष्मी नगर येथे सोमवार, २ फेब्रुवारी रोजी जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती, गोंदिया तर्फे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
​वारकरी संप्रदायाचे कळस आणि कुणबी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा द्वारका हॉस्पिटल जवळील संत तुकाराम महाराज प्रतिमा परिसरात सायंकाळी ४:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत संपन्न होईल.​या कार्यक्रमात मुख्य आकर्षण ‘हरिनामाचे कीर्तन’ असणार असून, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगलप्रसंगी गोंदियातील सर्व नागरिकांनी दर्शनाचा, कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

blank