23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी श्रीमती जयतुराबाई बिसेन सार्वजनिक वाचनालय परिसरातील एक विश्वसनीय माध्यम-खुशाल...

स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी श्रीमती जयतुराबाई बिसेन सार्वजनिक वाचनालय परिसरातील एक विश्वसनीय माध्यम-खुशाल कटरे

0
37

तिरोडा,दि.०८- बदलत्या शैक्षणिक वातावरणात इंटरनेट मोबाईल यांच्या वापराचे दुष्परिणाम नवीन पिढीवर होत असताना दिसत आहेत.दुष्परिणाम पासून जर विद्यार्थ्यांना दूर करायचे असेल तर साहित्याचे वाचन करणे दैनिक वर्तमानपत्रातून नवीन नवीन माहिती अर्जित करणे स्पर्धा पुस्तकांच्या अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणे याशिवाय दुसरा उपाय नाही.
सुसंस्कारित पिढी घडविण्याचे मोठे कार्य गावागावात उभारलेल्या वाचनालय करीत आहेत.
तिरोडा तालुक्यातील चिरेखणी येथे 1999 पासून सुरू असलेल्या श्रीमती जयतुराबाई बिसेन सार्वजनिक वाचनालय येथील एकूण नऊ वाचक शासकीय नोकरीत रुजू झाल्याने वाचकां दरम्यान नवचैतन्याचे वातावरण आहे.इतर वाचकांनी, प्रेरीत होऊन, स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीचे सातत्य कायम ठेऊन धारदार तयारी करावी.यश निश्चिच आपल्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन से.नि.प्राचार्य खुशाल कटरे यांनी केले.वाचनालय प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन वाचनालय सभागृहात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक आर.टी.बिसेन,प्रमुख अतिथी म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष घनश्याम पुनाजी पारधी,जीजामाता वाचनालय गोरेगावचे माजी अध्यक्ष खुशाल कटरे,मार्गदर्शक म्हणून गायत्री सार्वजनिक वाचनालय निमगावचे ललितकुमार रहांगडाले, आजीवन सदस्या सौ. हेमलताबाई रहांगडाले, संस्थेच्या सहसचिव सौ. कीर्ती छत्रपती बिसेन तथा सत्कारमूर्ती प्रमुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्राध्यापक छत्रपती बिसेन यांनी केले.वाचनालयाचे अध्यक्ष घनश्याम पुनाजी पारधी यांनी आवाहन केले की महाराष्ट्र शासन वाचकांना प्रेरणा मिळावी म्हणून गावोगावी वाचनालय सुरू केली.
हे वाचनालय चालविण्याकरता शासन तुटपुंजे अनुदान देते.खऱ्या अर्थाने या वाचनालयांचा विस्तार करायचा असेल तर लोकांनी जागृत होऊन, लोक वर्गणी गोळा करणे अत्यंत आवश्यक आहे.जेणेकरून खेड्यांमधील बुद्धिवंत व होतकरू विद्यार्थी एकत्रित येऊन वाचनालयातील स्पर्धा पुस्तकांच्या मदतीने स्पर्धा पूर्व परीक्षेची तयारी करून आपले जीवन बनवू शकतात.याप्रसंगी वाचनालयाच्या त्या वाचकांना शासकीय नोकरी मिळालेले आहे, अशा वाचकांच्या व त्यांच्या पालकांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून संकेत महादेव पुरम, अजय धनराज ठाकरे चांदनी प्रेमलाल रिनाईत,गिरीश दिगंबर ऊके उपस्थित होते.आभार ग्रंथपाल लक्ष्मीबाई बिसेन यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

blank