26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ आशा सेविका मंदा शिवणकर राज्यस्तरीय महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्काराने सन्मानित

आशा सेविका मंदा शिवणकर राज्यस्तरीय महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्काराने सन्मानित

0
38

सडक अर्जुनी-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांचे संकल्पनेतुन दि.22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील चर्चगेट जवळील यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी राज्यस्तरावरील कार्यक्रम सोहळ्यात राज्यातील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य संस्था,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्स,वैद्यकीय अधिक्षक,वैद्यकीय अधिकारी,सर्जनआशा सेविका यांचा सत्कार सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचे हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देवुन करण्यात आला.सदर राज्यस्तरावरील आरोग्य रत्न पुरस्कार कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त व अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे,संचालक आरोग्य सेवा(मुंबई) डॉ.नितीन अंबाडेकर,संचालक आरोग्य सेवा(पुणे) डॉ.विजय कंदेवाड, सार्वजनिक आरोग्य विभाग  सचिव डॉ.निपुन विनायक,सचिव ई.रविंद्रन यांचे सह राज्यस्तरावरील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी अंतर्गत उपकेंद्र सौंदड येथील श्रीराम नगर येथील आशा सेविका मंदा तेजराम शिवणकर यांनी जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सेवा,जनजागृती,प्रतिबंधात्मक उपाययोजना व गुणवत्तापुर्व आरोग्य सुविधा प्रदान करण्यात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केले आहे.त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, सेवाभाव व समाजहिताच्या योगदानाची राज्यस्तरावरुन दखल घेऊन महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्काराने गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांचेसोबत आशा सेविका जिल्हा स्तरीय कार्यक्रमाचे समन्वयक संजय दोनोडे सुद्धा उपस्थित होते.

     आरोग्य क्षेत्रातील आशा वर्करची भूमिका हि महत्वाची असते.माता आणि बाल आरोग्य कार्यक्रमात गर्भधारणा नोंदणीसुरक्षित प्रसूती  सोबत लसीकरण,पोषण, स्तनपानाचेनवजात शिशु काळजी,स्वच्छता व सवयी,कुटुंब नियोजन याचे महत्व,आरोग्य शिक्षण आणि प्रबोधन करण्यात महत्वाचे असते.गरोदर मातांची सुरुवातीलाच नोंदणी करणे आणि त्यांना प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आरोग्य केंद्रात घेऊन जाणे हे तिचे आद्य कर्तव्य. सामाजिक कार्यकर्ता म्हणुन औषध किट, रेफरल सेवा व टीबी आणि कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमात समुपदेशन करण्यास्तव कायम उपस्थित राहतात. साथीचे रोग (उदा. मलेरियाडेंग्यूटीबी)पसरल्यास जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाय सांगणे. प्राथमिक आरोग्य सुविधा जसे औषध किट  आशा वर्करकडे प्राथमिक औषधांचे किट असतेज्याद्वारे त्या तापहगवणलहान जखमा यांवर प्राथमिक उपचार करतात.रेफरल सेवा  गरजू रुग्णांनाविशेषतः गरोदर माता व बालकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाणे.टीबी आणि कुष्ठरोग नियंत्रण क्षयरोग रुग्णांना डॉटस उपचार आणि कुष्ठरोग रुग्णांना औषधोपचारात मदत करणे. सामाजिक कार्यकर्ता म्हणुन घरोघरी जाऊन विविध आरोग्य सर्वेक्षण करण्यात त्यांचा हातखंड असतो.

आशा सेविका मंदा शिवणकर यांना राज्यस्तरावरील महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्याचे नाव लौकीक उंचाविले आहे.उपलब्ध साधन सामुग्री त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर,उपाध्यक्ष सुरेश हर्षे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम लंजेजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

blank