भंडारा: केंद्रसरकार तर्फे 2027 मध्ये करण्यात येणार्या जनगणना मध्ये ओबीसी चा स्वतंत्र रकाना तयार करून ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी शिवसेना ओबीसी सेल तर्फे करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यां मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, ओबीसी सेल जिल्हा संघटक डॉ. सचिन निम्बारते ,युवासेना तालुका प्रमुख लोकेश बांते ,आकाश वाढइ,सोनू बांते ,रामकृष्ण बेदरकर ,रणजित ढबाले यावेळी उपस्थित होते. शिवसेना उपनेते आमदार नरेंद्र भांडेकर यांच्या निर्देशानुसार लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या हितासाठी होणार्या सर्व आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. ओबीसी समाजाचा आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात विकास होण्याच्या दृष्टीने स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.





