
गोंदिया(एकोडी),दि.०७ः एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या भोषनाळा तलाव (जुनेवानी) लघु सिंचन तलावाच्या दुरुस्तीकरिता जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले यांच्या विशेष प्रयत्नातून २५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामांतर्गत तलावाचे गेट दुरुस्ती, वेस्ट वेयर दुरुस्ती तसेच तलावाचे खोलीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल तसेच पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी तलावात साठून राहील. यामुळे जुनेवानी येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग करता येणार आहे.
या कामाचे भूमिपूजन आज दिनांक ६ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी पंचायत समिती सदस्य सौ. वंदनाताई पटले,गंगाझरी सरपंच सोनुभाऊ घरडे,माजी सरपंच रविकुमार पटले,माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पटले,बबलू रहांगडाले,शाखा अभियंता मयंक माधवानी,आर.डी.राणे,जितेश सोलंकी,ओमकार मडावी,किशोर टेकाम,विनोद कोपरकर,विजय डोंगरे,योगेंद्र टेकाम,दीपक टेकाम,श्यामकुवर इनवाते,चंद्रसिंगजी टेकाम यांच्यासह जुनेवानी व गंगाझरी येथील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.





