24.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या सम्राज्यवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाकपचे निवेदन

अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या सम्राज्यवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाकपचे निवेदन

0
98

गोंदिया,-भाजप सरकारने मूठभर कार्पोरेटच्या हितासाठी आणि एपस्टीन फाईल मधील सत्य दडविन्या साठी देशाला युद्ध आणि आर्थिक संकटाकडे नेण्याचे कार्य केले असल्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या राजव्यापी आव्हानानुसार अमेरिका व इस्रायल ने इरान वर केलेल्या सम्राज्यवादी हल्ल्याच्या धिक्कार करत अमेरिका जगाला युद्धाच्या खाईत लोटवत आहे आपले पंतप्रधान इस्रायलला गेले व दोन दिवसात इस्रायल ने इराण वर हल्ला केला या सम्राज्यवादी अमेरिकेचे हस्तक इस्रायलचा तीव्र निषेध करुण पक्षाच्या गोंदिया जिल्हा कौन्सिलच्या शिष्टमंडळाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी यांना भारताचे राष्ट्रपतीच्या नांवे निवेदन प्रस्तुत केले यात पक्षाचे कॉ. हौसलाल रहांगडाले, कॉ. मिलिंद गणवीर, कॉ. रामचंद्र पाटील, कॉ. करुणा गणवीर, कॉ. प्रल्हाद उके, गुणवंत नाईक, सुरेश रंगारी, हेमराज गौतम व कालिदास ठाकरे आदीचा शमावेश होता. प्रेषित निवेदनात इराणवरील बेकायदेशीर अमेरिकन -इस्राईली हल्ल्याच्या भारताने तीव्र निषेध नोंदवावा, खोमेनेयी यांच्यासह 48 नेत्यांच्या हत्येबद्दल बद्दल यु एन ओ मध्ये मध्ये कार्यवाहीचा आग्रह धरावा व संसदेत निषेध ठराव समंत करावा,भारताने अमेरिकेच्या सम्राज्यवादी गोटातून बाहेर पडावे, आखाती प्र देशात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या 95 लाख भारतीय नागरिकांच्या सुरक्षितते कडे दुर्लक्ष्य केले जात आहे वाढत्या युद्ध परिस्थितीमुळे ही कुटुंबे अत्यंत भीतीच्या वातावरणात जगत आहेत करिता या भारतीय नागरिकांची सुरक्षितता निश्चित व्हावी, ओमानमधील दुकाम बंदरगाहसह भारताचा कोणताही प्रदेश इरानवर हल्ला करण्यासाठी अमेरिका किंवा इस्रायलला वापरू देवू नये, सवलतीच्या दराने कच्चे तेल देण्याच्या रशियाने दिलेल्या प्रस्तावावर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना रशिया कडून तेल आयात करण्यासाठी तात्काळ पावले उचलावी,शेतकरी आणि एम एस एम ई यांना भरपाई द्या,युद्धा मुळे बासमती तांदूळ, साखर, कांदा, केळी, द्राक्षे यासारख्या शेतमालाची निर्यात स्थगित झाली आहे निर्यात थांबल्याने झालेल्या 50 हजार कोटी रुपयाच्या नुकसानीची त्वरित आर्थिक भरपाई द्या आणि प्रभावित शेतकरी व लघु उद्योजकांसाठी मदत निधी उभारा, तसेच भारत अमेरिका व्यापार रद्द करा, युद्धखोर सम्राज्यवाद विरोधात ठाम भूमिकाघ्या आदी मागण्याचा निवेदनात शमावेश आहे.

blank