भंडारा : शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना भंडारा जिल्ह्यात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत शाळेतील हैवान शिक्षक असे काही करायचा जे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. शिक्षकाचा पराक्रम उघड झाल्यानंतर संतप्त पालकांनी भर चौकात चप्पल जोड्यांनी त्याला चांगलाच चोपला. सतप्त पालकानी शिक्षकाला जाब विचारून भर चौकात चागलाच चोप दिला. याप्रकरणी पवनी पोलिस ठाण्यात या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
वडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेची पटसंख्या १९ असून ही एक शिक्षकी शाळा आहे. पाच वर्षांपूर्वी अनिल राऊत हा शिक्षक बदली होऊन या शाळेत आला. मात्र विकृत मानसिकतेच्या या शिक्षकाने शाळेत विद्यार्थिनींना शिकवण्याऐवजी भलतेच धडे देण्यास सुरुवात केली. चिमुकल्या विद्यार्थिनींना नको ते व्हिडिओ दाखवून हा शिक्षक शाळेतील मुलींशी अश्लील वर्तन करायचा. विद्यार्थिनी सोबत जवळीक साधून त्यांच्याशी गैरकृत करण्याचा प्रयत्न करायचा.
हा प्रकार मुलींच्या पालकांना समजला. त्यानंतर ग्रामस्थ मंगळवारी एकत्र येऊन शाळेत आले. त्यांनी संबंधित शिक्षकाला याबाबत विचारणा केली. त्या वेळी संतप्त झालेल्या काही महिलांनी संबंधित शिक्षकाला चप्पलने चोप दिला.





