तिरोडा,दि.११- शहरात बस स्टँडच्या समोर तिरोडा तुमसर राज्य महामार्गावर आज ११ मार्च रोजी सायकांळच्या सुमारास मारुती ओमनीला या चारचाकी वाहनातील गॅस लिकेज झाल्याने वाहनाने पेट घेतला.या भीषण आगीमध्ये कुठलीही जिवित हानी झाली नसून आजूबाजूच्या नागरिकांनी लगेच चारचाकी वाहनाला लागलेली आग विझविण्याकरीता पुढाकार घेतल्याने अनर्थ टळला.





