39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ अभियांत्रिकी सेवा परिक्षेत आमगावचा आशिष २९ रॅंकने उत्तीर्ण

अभियांत्रिकी सेवा परिक्षेत आमगावचा आशिष २९ रॅंकने उत्तीर्ण

0
181

blank

आमगाव,दि.१३ः महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत आमगाव येथील आशीष राहुलकुमार माहिरे यांनी उल्लेखनीय यश संपादन करीत महाराष्ट्रातून २९ वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे आमगाव शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आशीष माहिरे यांची निवड पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामधील सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट-अ) या पदासाठी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण विभागामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.आशीष माहिरे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशामागे आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक व मित्रांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.आशिषचे शिक्षण हे ५ ती १२ वी पर्यंत आदर्श विद्यालय आमगाव येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय वानाडोंगरी येथे झाले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

blank