28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता देवरीत दोन चोरट्यांना अटक

देवरीत दोन चोरट्यांना अटक

0
100
गोंदिया, ता. १७ ः दुचाकीच्या हॅण्डलला लटकवलेला थैला चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना देवरी पोलिसांनी सोमवारी (ता. १६) रात्री पावणेबाराच्या सुमारास अटक केली. हैदरअली ईमदाद अन्सारी (वय ५४) व वसीम खान वकार अहमद खान (वय ४२, दोघेही रा. दुर्ग, छत्तीसगड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याबाबत फिर्यादी अशोक मोतीराम रहिले (वय ५१, रा. शिलापूर, ता. देवरी) यांनी देवरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक रहिले हे शनिवारी (ता. १४) सकाळी अकराच्या सुमारास  १७ हजार रुपये बॅंक आॅफ इंडियाच्या देवरी येथील आपल्या खात्यात जमा करण्यासाठी गेले होते. परंतु, शनिवारी बॅंक बंद असल्याने ते नंतर आैषधी घेण्यासाठी आशीष मेडिकलमध्ये गेले. यावेळी त्यांनी मेडिकलसमोर दुचाकी उभी करून रोख १७ हजार रुपये, मोबाइल आणि बॅंक पासबुक असलेला थैला दुचाकीच्या हॅण्डलला लटकविला होता. आैषध घेऊन परत आल्यावर त्यांना थैला दिसला नाही. याबाबतची तक्रार त्यांनी देवरी पोलिसात केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या घटनेतील आरोपी हैदरअली ईमदाद अन्सारी व वसीन खान वकार अहमद खान यांना सोमवारी अटक केली.  या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार हातझाडे करीत आहेत. याच आरोपींनी सोमवारी (ता. १६) आमगावच्या अॅक्सीस बॅंकेसमोरून दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे.
blank