37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ रणरणत्या उन्हात महावितरणचा ‘थंडावा’; कोंढाळी उपविभागात पाणपोईचा शुभारंभ

रणरणत्या उन्हात महावितरणचा ‘थंडावा’; कोंढाळी उपविभागात पाणपोईचा शुभारंभ

0
40

blank

कोंढाळी, दि. 18 मार्च 2026: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका वाढू लागला असून, नागरिकांची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणच्या कोंढाळी उपविभागांतर्गत येणाऱ्या कचारी सावंगा शाखा कार्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांसाठी आणि वाटसरूंसाठी कार्यालय परिसरात ‘पाणपोई’ सुरू करण्यात आली असून, याचे रीतसर उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले.

 महावितरण कार्यालयात दररोज शेकडो नागरिक वीज देयके भरणे, नवीन वीज जोडणी किंवा तांत्रिक तक्रारींसाठी येत असतात. लांबून येणाऱ्या या ग्राहकांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळावी, या उद्देशाने ही पाणपोई कार्यान्वित करण्यात आली आहे. काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक आघाव यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “ग्राहक हा महावितरणचा केंद्रबिंदू आहे. केवळ वीज सेवा देणे एवढेच आमचे कर्तव्य नसून, कडक उन्हात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तहान भागावी, हा यामागचा शुद्ध हेतू आहे. ही पाणपोई संपूर्ण उन्हाळाभर सुरू राहणार असून, कर्मचारी, ग्राहक आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला याचा लाभ घेता येईल.” यावेळी कोंढाळी उपविभाग आणि रिधोरा/कचरी सावंगा शाखा कार्यालयातील अभियंते, तंत्रज्ञ आणि कर्मचारी मोठ्या संखेय्ने उपस्थित होते

 वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता महावितरणने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि सामाजिक जाणिवेबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. रणरणत्या उन्हात महावितरणने दिलेल्या या ‘थंडाव्या’मुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेचे स्वागत होत आहे.

blank