
मोहाडी,दि.३०ः– तालुक्यातील आंधळगाव येथील श्याम दहेकर यांच्या शेतबोळीत पोहण्यासाठी गेलेल्या आरुस राजेश नशीने (वय १५)या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ३० मार्च रोजी सायकांळी ४ वाजेच्या सुमारास घडली.राजेश नशीने यांना एकच मुलगा असून तो मुलगा दत्तक घेतलेला होता.घटनेनंतर पोहण्याकरीता गेलेले मृतकांचे सोबती घटनास्थळावरुन पसार झाल्याचे बोलले जात आहे.





