30.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ खापा येथे भीषण अपघात; कुंदाताई राऊत थोडक्यात बचावल्या

खापा येथे भीषण अपघात; कुंदाताई राऊत थोडक्यात बचावल्या

0
123

नागपूर : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत यांच्या वाहनाला तुमसर तालुक्यातील खापा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंदाताई राऊत या संघटन सृजन अभियानानिमित्त भंडारा–तुमसर येथे गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून परत येत असताना खापा परिसरात समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक संगीता बेनिवाल तसेच त्यांचे वैयक्तिक सहाय्यक (पी.ए.) उपस्थित होते.
धडकेमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ सर्वांना बाहेर काढण्यात आले. सर्वजण सुखरूप असून काहींना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

blank