26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ लायन्स क्लब पॉवरसिटी तिरोडा व सुपर वूमन क्लबच्या संयुक्त विद्यमाने चुरडी येथे...

लायन्स क्लब पॉवरसिटी तिरोडा व सुपर वूमन क्लबच्या संयुक्त विद्यमाने चुरडी येथे वृक्षारोपण

0
15

चित्रा कापसे/तिरोडा-पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब पॉवरसिटी तिरोडा व सुपर वूमन क्लब तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने चुरडी येथे १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा, चुरडी येथे विद्यार्थ्यांसाठी आकर्षक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला लायन्स क्लब पॉवरसिटी तिरोडाच्या अध्यक्षा तसेच जिल्हा परिषद सदस्या ॲड. माधुरी रहांगडाले प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक वृक्ष लागवड व संगोपन करण्याचे आवाहन केले. तसेच गुरूंचा सन्मान, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्राची गडघे, सुपर वूमन क्लब गोंदियाच्या अर्चना तिडके, विजया हत्तेवार, राणी बालकोठे, रागिणी पटले, पौर्णिमा शर्मा, प्रतिभा मेश्राम, राजकुमारी मलेवार, वैशाली पाटील, प्राजक्ता हत्तेवार, उमाशंकरजी पारधी, ढोरे सर, भारद्वाज सर, सरपंच सपना इनवते, छबीता मेश्राम, तृप्ती भोयर तसेच क्लबच्या सर्व महिला सदस्यांची उपस्थिती होती.

वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

blank