25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ लाखनीत व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य आणि वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा

लाखनीत व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य आणि वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा

0
61

स्वप्नपूर्ती फाऊंडेशनचा उपक्रम

लाखनी : वक्तृत्व कौशल्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने खुलवते. संभाषण कौशल्य त्याला अधिक बहर आणते. त्यामुळे विद्यार्थी, युवक, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत लोक यांच्यामध्ये वक्तृत्व, संभाषण कौशल्यांचा विकास व्हावा आणि उत्तम अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावे, या दृष्टीने स्वप्नपूर्ती फाऊंडेशनच्या वतीने तसेच समर्थ महाविद्यालयाच्या सहकार्याने लाखनी येथे व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य आणि वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्तिमत्वाचे घटक, सूत्रसंचालन, मंच व्यवस्थापन, वक्तृत्व विकास, वक्ता म्हणून कसे सादर व्हावे, नेतृत्व विकास, सादरीकरण, संभाषण कौशल्य आणि त्याचे महत्व, संभाषण कौशल्य विकसित कसे करावे आदी विषयांवर तज्ञांद्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या कार्यशाळेला भेट देतील आणि सहभागी लोकांशी संवाद साधणार आहेत. समर्थ महाविद्यालय लाखनी येथे २० ते २१ एप्रिल दरम्यान दुपारी १ ते संध्या. ६ या वेळेत दोन दिवस ही कार्यशाळा चालणार आहे. या कार्यशाळेत सर्व सत्रानंतर प्रश्नोत्तराचा महत्त्वपूर्ण तास होणार आहे. दरम्यान, ज्यांना कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यासाठी नोंदणी करायची आहे. सदर कार्यशाळा केवळ नोंदणी केलेल्या लोकांसाठी आहे.

शिक्षक बांधव, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग व इतर सर्व इच्छुकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यशाळा संयोजक विशाल हटवार, नितेश टिचकुले, मिनाक्षी सिंगणजुडे, आशिष राऊत, भीष्म लांडगे, लिखित पुडके, दुर्गेश टिचकुले, कोमल वाघाये यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संयोजकांना 8411012404, 7741862565, 9130555225 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.