25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ शिक्षक संघटना समन्वय महासंघाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठण;१२ शिक्षक संघटना एकवटल्या

शिक्षक संघटना समन्वय महासंघाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठण;१२ शिक्षक संघटना एकवटल्या

0
60
शिक्षक समन्वय महासंघाला मिळाले नवे बळ
यवतमाळ:-यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना समन्वय महासंघाच्या सभेचे आयोजन दिनांक ३ एप्रिलला सहकार भवन यवतमाळ येथे करण्यात आले होते.या प्रसंगी जिल्ह्यातील १२ शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या सभेत शिक्षकांच्या जिल्हा परिषद अंतर्गत विविध समस्येवर विचार मंथन करण्यात आले .यावेळी शिक्षक संघटना समन्वय महासंघाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठण करून निवड करण्यात आली. या सभेचे आयोजन निमंत्रक किरण मानकर, रमाकांत मोहरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .याप्रसंगी शिक्षकावर होत असलेल्या अन्याया विरोधात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या असून जिल्हा परिषद अंतर्गत निर्गमित करण्यात आलेला शिक्षकांना जिल्हा परिषद इमारतीकडे येण्यास मज्जाव करणारा निर्णय हा अन्याय कारक असून जिल्हा परिषद ही ग्राम विकासाची जननी असुन ग्राम विकासाचा पाया आहे.त्या अंतर्गत कार्य करणारे शिक्षक हे अविभाज्य घटक आहे. शिक्षकांना सेवा अंतर्गत येणाऱ्या विविध समस्या तक्रारी व गाऱ्हाणी अधिकाऱ्याकडे मांडाव्या लागतात. पुर्व परवानगीने येण्यास मज्जाव करणारा निर्णय अन्याय कारक असून तो त्वरित मागे घ्यावा. ऐन पगार मिळण्याच्या दिवसात साधना सप्ताह साजरा करण्याच्या नावा खाली २ एप्रिल ते ८ एप्रिल पर्यंत आय गॉट ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स पुर्ण केल्या शिवाय पगार मिळणार नाही. अशी देण्यात आलेली तंबी शिक्षकांना वेठीस धरणारी असून यावर जिल्हा परिषद प्रशासनाने पुनर्विचार करुन शिक्षकांचे वेतन देण्यात यावे.अशा विविध महत्त्व पुर्ण मुद्यावर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय महासंघाचे पुनर्गठण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील १२ शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.याप्रसंगी सर्वानुमते शिक्षक संघटना समन्वय महासंघाचे पुनर्गठन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने निमंत्रक म्हणून किरण मानकर ,समन्वयक म्हणुन आसाराम चव्हाण, राजेश उदार, नदीम पटेल, प्रसिध्दी प्रमुख राजहंस मेंढे, सचिन तंबाखे, सल्लागार म्हणून डॉ. सतपाल सोवळे,प्रकाश सालपे, किरण राठोड ,मार्गदर्शक रमाकांत मोहोरकर, इनायत खान यांच्यासह सदस्य म्हणून शरद घारोड,तुषार आत्राम, नरेश खरतडे, अनिल सरताबे, मोहम्मद रफीक ,सारंग भटूरकर ,स्वप्निल फुलमाळी, संतोष मरगडे, झाकीर हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.समन्वय महासंघामध्ये इतरही शिक्षक संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले., शिक्षक संघटना समन्वय महासंघाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठण झाल्यामुळे शिक्षक समन्वय महासंघाला नवे बळ मिळाले आहे.या वेळी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.