39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोंदिया रेल्वे स्थानकावर दुरंतो गाड्यांना थांबा देण्याची मागणी — डीआरयूसीसी सदस्यांकडून महाप्रबंधकांना...

गोंदिया रेल्वे स्थानकावर दुरंतो गाड्यांना थांबा देण्याची मागणी — डीआरयूसीसी सदस्यांकडून महाप्रबंधकांना निवेदन

0
76

गोंदिया : आज गोंदिया रेल्वे स्थानकावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.या वेळी डीआरयूसीसी सदस्य श्री विनोद (गुड्डू) चांदवानी यांनी गाडी क्रमांक 12261/12262 हावडा–मुंबई दुरंतो एक्सप्रेस तसेच 12221/12222 पुणे–हावडा दुरंतो एक्सप्रेस या गाड्यांना गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी ठामपणे मांडली.
निवेदनात नमूद करण्यात आले की गोंदिया रेल्वे स्थानक विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे व गर्दीचे स्थानक असून, येथे दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. छत्तीसगड व मध्यप्रदेश सीमेच्या जवळ असल्याने येथून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विशेषतः विद्यार्थ्यांना पुणे येथे ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण पुणे–हावडा दुरंतो एक्सप्रेसला येथे थांबा नाही.तसेच अलीकडेच नागपूर–हावडा दुरंतो एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे, मात्र गोंदिया सारख्या महत्त्वाच्या स्थानकावर अद्याप या गाड्यांचा थांबा देण्यात आलेला नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी मंडल रेल्वे प्रबंधक  दीपक कुमार गुप्ता तसेच सीनियर डीसीएम दिलीप सिंह उपस्थित होते.
कार्यक्रमात इतर डीआरयूसीसी सदस्यांमध्ये लखमीचंद रोचवानी,चीनू अजमेरा,हरीश भागवानी,मुकेश दुंबानी,सुनील बोदानी,यश नानवानी,राजू आसवानी व जसपाल सिंह उपस्थित होते.शेवटी महाप्रबंधक महोदयांना जनहित व विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.