23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार नौका विहारचा आनंद; खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार नौका विहारचा आनंद; खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते शुभारंभ

0
71

गोंदिया। आज नवेगाव बांध येथील राष्ट्रीय उद्यानातील जलाशयावर नौका विहार (बोटिंग) सुविधेचा भव्य शुभारंभ खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभ हस्ते व आमदार राजकुमार बडोले व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.blank

एस.के. इन्फ्रा, गोंदिया यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात प्रथमच या नौका विहार (बोटिंग) सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरिकांसह परिसरातील पर्यटनप्रेमी व निसर्गप्रेमींसाठी ही एक आकर्षक सुविधा उपलब्ध झाली आहे.या सुविधेमुळे जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार असून नागरिकांना नवेगाव बांध येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत नौकाविहार करता येणार आहे. तसेच या प्रकल्पातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत असे प्रतिपादन प्रफुल पटेल यांनी केले.

blank

शुभारंभ प्रसंगी राजेंद्र जैन, राजकुमार बडोले, लायकराम भेंडारकर, देवेंद्रनाथ चौबे, चंद्रपाल चौकसे, आम्रपाली डोंगरवार, रचनाताई गहाणे, गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार, केवलराम पुस्तोडे, संदीप कापगते, प्रमोद लांजेवार, शैलेश जायस्वाल, नामदेव डोंगरवार, दादाजी फुंडे, नितीन पुगलिया, होमराज पुस्तोडे, पुष्पलताताई द्रुगकर, अनिरुद्ध कांबळे, समीर बनसोडे, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, सुनील तरोणे, राकेश लंजे सहित मोठ्या संख्येने नागरिक व पर्यटन प्रेमी उपस्थित होते.

blank

blank