नाशिक/वृत्तसेवा-नाशिकमध्ये एका आयटी कंपनीत तरुण मुलींचे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.आणि पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल झाले आहेत.नाशिकमध्ये कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणारी संतापजनक घटना समोर आली आहे.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत कामाला असलेल्या तरुणींवर प्राथमिक माहितीनुसार, संबंधित आयटी कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी 18 ते 25 वयोगटातील तरुण मुलींवर अत्याचार केला आहे.18 ते 25 वयोगटातील तरुण मुलींना करिअरची भीती दाखवून किंवा पदाचा गैरवापर करून या तरूण मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत. यामध्ये शारीरिक शोषण, केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या अत्याचारामुळे तरुणी मानसिक तणावाखाली गेल्या होत्या. नाशिकमधील या प्रकरणात 20 ते 25 तरूण मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलीस आयुक्तांनी संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. ही विशेष तपास पथकाची टीम आता आयटी कंपनीतील अंतर्गत कामकाजाची आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे.
या प्रकरणात एकूण 6 आरोपी आहेत, तर 5 पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे. 5 पुरुष आरोपींना अटक केली आहे. एक महिला आरोपी फरार झाली आहे. 5 ही आरोपीना कोर्टात हजर करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील पीडित महिलांना न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या इतर मुलींनी तक्रार नोंदवावी, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन नाशिक पोलिसांनी दिले आहे. नाशिकसारख्या शहरात आयटी कंपनीमध्ये घडलेल्या या घटनेने राज्यातील आयटी क्षेत्रात काम करणार्या महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.





